१७ ऑगस्ट: दिनविशेष
जन्म
- १७६१: बंगाली आणि मराठी गद्यलेखनाच्या पाया घालणारे धर्मप्रसारक पं. विल्यम केरी यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १८३४)
- १८४४: इथियोपियाचा सम्राट मेनेलेक (दुसरा) यांचा जन्म.
- १८६६: हैदराबादचा सहावा निजाम मीर महबूब अली खान यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट १९११)
- १८८८: श्री शिवाजी मराठा हायस्कूल पुणे चे संस्थापक बाबूराव जगताप यांचा जन्म.
- १८९३: हॉलीवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका मे वेस्ट यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९८०)
- १९०५: ग्रंथसूचीकार शंकर गणेश दाते यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर १९६४)
- १९१६: ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक डॉ. विनायक पेंडसे यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑगस्ट १९७५)
- १९२६: चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे मुख्य सचिव जिआंग झिमिन यांचा जन्म.
- १९३२: नोबेल पारितोषिक विजेते त्रिनिदादी-भारतीय लेखक व्ही. एस. नायपॉल यांचा जन्म.
- १९४४: ओरॅकल कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक लैरी एलिसन यांचा जन्म.
- १९४९: इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांचा जन्म.
- १९७०: अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू जिम कुरिअर यांचा जन्म.
- १९७२: बांगला देशचा क्रिकेटपटू हबीब उल बशर यांचा जन्म.
आजचे पंचांग दिनविशेष मृत्यू
- १३०४: जपानी सम्राट गोफुकाकुसा यांचे निधन.
- १८५०: पेरू देशाचे पहिले अध्यक्ष जोस डे सान मार्टिन यांचे निधन. (जन्म: २५ फेब्रुवारी १७७८)
- १९०९: क्रांतीकारक मदनलाल धिंग्रा यांनी न्यायालयात स्वतःहून फाशीची शिक्षा मागितली आणि त्यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १८८३)
- १९२४: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू टॉम केन्डॉल यांचे निधन.
- १९८८: पाकिस्तानचे ६वे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया उल हक यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९२४)
आजचे पंचांग दिनविशेष महत्वाच्या घटना
- १६६६: शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतून पळून गेले.
- १८३६: रजिस्ट्रेशन ऑफ बर्थस अॅक्ट ब्रिटिश संसदेने मान्यता दिली, अंमलबजावणी १८३७ पासून सुरू झाली.
- १९४५: ईंडोनेशियाने नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य प्राप्त केले.
- १९५३: नार्कोटिक्स अॅनॉनिमस या संस्थेची पहिली सभा दक्षिण कॅलिफोर्नियात झाली.
- १९८२: जर्मनीत पहिली सी. डी. विकली गेली.
- १९८८: पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया उल हक आणि अमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत अर्नोल्ड रॅफेल विमान अपघातात ठार झाले.
- १९९७: उस्ताद अली अकबर खाँ यांना अमेरिकेचा नॅशनल हेरिटेज पुरस्कार प्रदान.
- १९९९: तुर्कस्तानच्या इझ्मित शहराजवळ ७.४ रिश्टर तीव्रतेचा भूकंप; १७,००० ठार, ४४,००० जखमी.
- २००८: मायकेल फेल्प्सने एकाच ऑलिंपिक स्पर्धेत आठ सुवर्ण पदकांची कमाई करून नवा विक्रम केला.
आजचे पंचांग दिनविशेष : १७ ऑगस्ट 2024
सूर्योदय: ६:२० AM सूर्यास्त: ६:५६ PM चन्द्रोदय: ५:१५ PM चन्द्रास्त: ४:२७ AMविक्रम संवत: २०८१, पिंगल शक सम्वत: १९४६, क्रोधी पूर्णिमांत: श्रावण अमांत: श्रावण तिथि
- शुक्ल पक्ष द्वादशी: Aug 16 09:39 AM – Aug 17 08:06 AM
- शुक्ल पक्ष त्रयोदशी [क्षय तिथि]: Aug 17 08:06 AM – Aug 18 05:51 AM
- शुक्ल पक्ष चतुर्दशी: Aug 18 05:51 AM – Aug 19 03:05 AM
- पूर्वाषाढ़ा: Aug 16 12:43 PM – Aug 17 11:48 AM
- उत्तराषाढ़ा: Aug 17 11:49 AM – Aug 18 10:14 AM
- बालव: Aug 16 08:58 PM – Aug 17 08:06 AM
- कौलव: Aug 17 08:06 AM – Aug 17 07:03 PM
- तैतिल: Aug 17 07:03 PM – Aug 18 05:51 AM
- गर: Aug 18 05:51 AM – Aug 18 04:31 PM
- प्रीति: Aug 16 01:11 PM – Aug 17 10:47 AM
- आयुष्मान: Aug 17 10:47 AM – Aug 18 07:50 AM
- सूर्योदय: 6:20 AM
- सूर्यास्त: 6:56 PM
- चन्द्रोदय: Aug 17 5:15 PM
- चन्द्रास्त: Aug 18 4:27 AM
- राहू: 9:29 AM – 11:04 AM
- यम गण्ड: 2:12 PM – 3:47 PM
- कुलिक: 6:20 AM – 7:55 AM
- दुर्मुहूर्त: 08:01 AM – 08:51 AM
- वर्ज्यम्: 07:17 PM – 08:47 PM
- अभिजीत मुहूर्त: 12:13 PM – 01:03 PM
- अमृत काल: 07:45 AM – 09:18 AM, 04:15 AM – 05:44 AM
- ब्रह्म मुहूर्त: 04:44 AM – 05:32 AM
- मातंग: Up to 11:48 AM
- राक्षस
- अमांत: श्रावण
- पूर्णिमांत: श्रावण
- सर्वार्थसिद्धि योग: Aug 18 06:20 AM – Aug 18 10:14 AM (Uttara Ashadha and Sunday) संग्रहात्मक माहिती: वरील माहिती विविध स्त्रोतांवर आधारित आहे. त्यामुळे काही मुद्द्यांमध्ये त्रुटी किंवा विसंगती असण्याची शक्यता असते. वाचकांनी ही माहिती तपासून आणि खात्री करून घेणे आवश्यक आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, ज्यामुळे माहिती अधिक अचूक आणि उपयुक्त होऊ शकते.
Post Views: 24