First Meeting of Bahirji Naik and Shivaji Raja 2

बहिर्जी नाईक आणि शिवाजी राजांची पहिली भेट २

First Meeting of Bahirji Naik and Shivaji Raja 2

Bahirji Naik

Bahirji Naik बहिर्जी नाईक

दौलतरावाने जिजाऊसाहेबांना पुन्हा नमस्कार केला आणि आनंदाच्या भरात धावतच निघाला. त्याच्या उतावळेपणाचे लालमहालात सगळ्यांनाच कौतुक वाटत होते. जिजाऊंची नजर मात्र दौलतराव गेला त्या दिशेकडे खिळली होती. जणू दौलतरावाच्या रुपात त्यांना मोठे रत्न मिळाल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटले होते.

शिवाजी महाराजांनी तानाजीवर वार केला. तानाजीने तितक्याच चपळतेने शिवबांचा वार गळ्याजवळ झेलला. शिवबांच्या तलवारीचा एक प्रहार तानाजीने जाणूनबुजून चुकवला आणि किंचित शरीर बाजूला केले. शिवबांची तलवार जमिनीवरील दगडावर आदळली. दगड आणि तलवारीच्या घर्षणाचा आवाज झाला. त्या घर्षणातून ठिणग्या उडाल्या. शिवबांनी वळून तलवार फिरवली, इतक्यात तानाजीने प्रहार केला. शिवबांनी तो तलवारीवर झेलला. तानाजीने दोन्ही हातांनी एक तलवार पकडत संपूर्ण ताकदीनिशी प्रहार सुरू ठेवले होते.

शिवबा तानाजीची सुऽऽऽ आवाज करत आदळणारी तलवार त्यांच्या तलवारीवर झेलत होते. शिवबांनीही आता तलवार दोन्ही हातांनी पकडली होती. तलवार एका हातात असती तर आक्रमक झालेल्या तानाजीच्या दोन-तीन फटक्यात शिवबांची तलवार जमिनीवर पडली असती. काही वेळात तानाजीच्या तलवारीचा वेग मंदावला. मग शिवबांनी तलवार फिरवली आणि तलवारीचा एक फटका तानाजीने पकडलेल्या तलवारीच्या मुठीजवळ मारला. तानाजीच्या हाताला चांगलाच दणका बसला होता. तानाजीची मूठ सैल झाली. ती पुन्हा घट्ट करणार इतक्यात शिवबांच्या तलवारीचा जोरदार प्रहार झाला. तानाजीची तलवार जमिनीवर पडली. जमलेल्या सगळ्या सवंगड्यांनी टाळ्या पिटल्या.

Bahirji Naik बहिर्जी नाईक

Bahirji Naik Photo

“वा शिवबाराजे!” कान्होजी जाधव म्हणाला.

“तानाजी दादा, खुराक अजून वाढवा.” हसत सूर्याजी मालुसरे म्हणाला.

“अरे ताना, तू काहीही कर; पण शिवबांना नाही हरवू शकत!” आबाजी म्हणाला.

“नाही. आज तानाजींनी आम्हास हरवलेच असते!” निराश झालेल्या तानाजीच्या कानावर शिवबांचे सकारात्मक शब्द पडले. तानाजीने वळून शिवबांकडे पाहिले.

“आम्ही हरण्याच्या अगदी जवळ पोचलो होतो; पण तानाजींनी एक चूक केली.” शिवबा म्हणाले.

“काय चूक शिवबाराजे?” तानाजीने स्वतःच्या तलवारीवर नजर फिरवत विचारले.

“जसा संयम राखला होता तसाच अजून राखायला हवा होता. आम्ही संयम राखला म्हणून तुम्ही आक्रमक झालात. शक्ती घालवलीत. शेवटपर्यंत झुंजायचे असेल, तर बुद्धी आणि शक्ती यांचा अचूक वापर करायचा असतो ताना! आपल्या मुठीत तलवार नाही. तानाजी, स्वराज्याची जबाबदारी असणार आहे. म्हणून आपल्या मुठीला खूप महत्त्व प्राप्त होते. ती ढिली पडता कामा नये! शत्रू लढण्यासाठी पुन्हा संधी देत नाही. आपली तलवार जमिनीवर पडल्यास युद्धात आपली मान धडावेगळी होणार इतके निश्चित. पण जर आपण संयम ठेवला तर शत्रूची!” शिवबा म्हणाले.

“तुमचे म्हणणे पटते आहे शिवबाराजे. मी संयम सोडायला नको होता! या पुढे कधीच ही चूक माझ्या हातून होणार नाही. स्वराज्यासाठी लढताना तर नाहीच नाही!” तानाजी म्हणाला.

“एक गोष्ट नेहमी लक्षात असू दया. शिवबासाठी तुम्ही तुमचे बलिदान दिल्याने कधीच स्वराज्य उभे राहणार नाही. आपला जीव देऊन नाही, तर शत्रूचा जीव घेऊन आपल्याला स्वराज्य निर्माण करायचे आहे.” राजे म्हणाले.

शिवबांच्या प्रेरणादायी शब्दांनी सगळ्यांची छाती उंचावली होती. ही आठ-दहा मुले होती; पण सगळी एकापेक्षा एक होती. अगदी पारख करून हिरे निवडावे तसे शिवबांनी स्वराज्याचे खांदे निवडले होते. कोणी धनुर्विद्येत पारंगत, कोणी दांडपट्टा चालवण्यात माहीर, तर कोणी भाला फेकण्यात तरबेज. शिवबांनी सर्वांना सगळ्या विद्या शिकणे बंधनकारक केले होते. आजपर्यंत शिवबा जे काही शिकले होते, ते सर्वकाही त्यांच्या सहकाऱ्यांना शिकवत होते. त्यांना प्रोत्साहित करत होते. लहानपणापासूनच एक विलक्षण बुद्धी शिवबांना लाभली होती. त्यांच्यातल्या अलौकिक गुणांपैकी एक असलेल्या नेतृत्वगुणाने मावळातली मुले संघटित होत होती. शिवबा मुलांना नीट पारखून परीक्षा घेऊनच आपल्यासोबत घेत होते. त्यांचे ध्येय त्यांच्या डोळ्यांपुढे होते.

Bahirji Naik बहिर्जी नाईक

Bahirji Naik बहिर्जी नाईक

‘स्वराज्याचे ध्येय’ हे खरे तर एक स्वप्न होते, ज्याला शिवबा आणि जिजाऊंनी ध्येयात परावर्तीत केले होते. पित्यासारखे कोण्या शासकाच्या मक्तेदारीत काम करणे शिवबांना भविष्यात सहज शक्य झाले असते; परंतु त्याने काही साध्य होणार नाही हे सरदार शहाजीराजेही जाणून होते. त्यांनी निजामशाहीचीही चाकरी केली होती आणि आदिलशाहीचीसुद्धा. हे शासक एकाच धर्माला जास्त महत्त्व देतात आणि याच जमिनीवर हजारो वर्षांपासून राहणाऱ्या लोकांना त्रास देतात ही गोष्ट शहाजीराजांच्यासुद्धा जिव्हारी लागत होती. त्यांनी त्यांच्या मनाची घालमेल एकदा जिजाऊंना सांगितली होती आणि तेव्हापासून या स्वराज्याच्या स्वप्नाची सुरुवात झाली होती.

“शिवबा, मी तलवारबाजी शिकलो, भाला फेकणे शिकलो; पण मला दांडपट्टा चालवणं का शिकवत नाही आहात?” विश्वनाथजी म्हणाला.

“शिकवीन आणि दांडपट्टा काय विश्वनाथजी, तुम्ही जी गोष्ट चालवू शकता ती तर आमच्यापैकी कोणीही इतकी उत्कृष्ट चालवू शकत नाही. ती गोष्ट म्हणजे कुंचला. तुम्ही छान चित्रे काढता.” शिवबा म्हणाले. विश्वनाथजी एक उत्कृष्ट चित्रकार मूर्तिकार होता. पित्याचा वारसा त्याच्या अंगगुणात उतरला होता. पण लढताना त्याच्या चित्रकलेचा काय लाभ होणार या प्रश्नाने सगळ्यांना विचार करण्यास भाग पाडले होते.

“स्वराज्यासाठी तो कुंचला कसा उपयोगात येईल? त्यापेक्षा दांडपट्टा शिकलो, तर चार मुंडकी तरी उडवेन!” विश्वनाथजी म्हणाला.

“अशी कोणतीही कला नाही विश्वनाथजी, जी स्वराज्याच्या उपयोगास येणार नाही. आपल्याला हव्या असलेल्या किल्ल्यांची नीट पाहणी करून तुम्ही त्यांचे संपूर्ण चित्र रेखाटू शकता. नकाशे बनवू शकता आणि तुमच्या ह्या कलेमुळे आपल्याला किल्ल्यांचे अचूक ज्ञान मिळेल. परिणामी आपण जेव्हा लढू तेव्हा आपल्या सैन्याची नासाडी होण्यापासून वाचवू शकतो.”

“विश्वनाथ तू ढाल हो स्वराज्याची.” तानाजी आनंदाने म्हणाला.

“नक्कीच! पण शत्रूच्या किल्ल्यात जाऊन किल्ल्याची जशीच्या तशी माहिती कशी मिळवायची?”

Bahirji Naik बहिर्जी नाईक

शिवबा पुढे काही बोलणार इतक्यात त्यांना मोराच्या केकारवण्याचा आवाज ऐकू आला. शिवबांनी डोळ्यांनीच साथीदारांना इशारा केला. सगळ्यांनी आपल्या तलवारी झुडुपात लपवल्या आणि विटी-दांडूचा खेळ खेळू लागले. शिवबांची नजर रस्त्याकडेच लागली होती. तेव्हा त्यांना एक सशक्त मुलगा येताना दिसला. एका हातात मनगटापर्यंत चार सुवर्णकडे घातले होते. नुकत्याच मिशा फुटल्या होत्या; परंतु त्यांना आकड्यात वळवले होते. अंगात काळी बंडी, गुडघ्यापर्यंत पांढरे मळकट धोतर होते. धोतरावर रक्ताचे डाग पसरले होते. कमरेत खंजीर खोवला होता.

त्याची शोधक नजर शिवबांना पाहून थांबली. नजर खिळवून तो फक्त शिवबांना पाहत राहिला. शिवबांच्या चेहऱ्यावरील तेज, चंद्रकोरी टिळा, कपाळातून निघालेले लांबसडक नाक, डोईवर जिरेटोप आणि त्यावर झुलणारी मोत्यांची माळ. भुवयांच्या खाली पटकन लक्ष वेधून घेणारी भेदक नजर. ओठांवर किंचित स्मित; पण त्या स्मितामागची गंभीरता. अत्यंत विलक्षण व्यक्तिमत्त्व होते ते.

“आपण कोण?” शिवबांनी विचारले.

शिवबांच्या शब्दाने दौलतराव भानावर आला.

“राजे, मी रामोशाचा दौलतराव! मी तुमच्या आणखी जवळ येऊ शकतो का?” दौलतरावाने विचारले.

“थांब! तुझ्या कमरेतला खंजीर तिथंच टाक.” सूर्याजी कडाडला.

Bahirji Naik बहिर्जी नाईक

सूर्याजीच्या चेहऱ्यावरून नजर काढत दौलतरावाने कमरेत अडकवलेला खंजीर तिथेच खाली टाकला आणि चार पावले पुढे आला. हातातील सुवर्णकडे शिवबांना दाखवत दौलतराव म्हणाला,

“मी लांडग्यांच्या पंधरा शेपट्या माँसाहेबांना दाखवल्या आणि त्यांनी मला बक्षीस म्हणून हे चार सुवर्णकडे आणि नाणी दिलीत.”

“पंधरा शेपट्या? तुम्ही एकट्याने?” शिवबांनी विचारले.

“होय! तसं शिकार करणं हे माझं आवडतं काम आहे. त्यात नवनवीन युक्त्यांनी सापळा रचून शिकार करण्यात खूप आनंद मिळतो.”

शिवाजी महाराज एकटक दौलतरावाकडे पाहत होते.

“राजे!” दौलतराव पुटपुटला.

“तुम्ही इकडे कसे आलात?” राजांनी विचारले.

“माँसाहेबांनी मला तुम्हाला भेटायला सांगितले.”

Bahirji Naik बहिर्जी नाईक

Bahirji Naik बहिर्जी नाईक

स्वराज्य कार्यात दौलतरावाला सामावून घेण्याचा जिजाऊंचा इशारा शिवबांनी ओळखला होता.

“तुम्हाला कोण-कोणती शस्त्रे चालवता येतात?” शिवबांनी विचारले.

“भाला, खंजीर, तलवार, दांडपट्टा ही शस्त्रे चालवण्यात हात चांगला बसलाय राजे. या विद्यांमुळे आम्ही शिकारी त्या दुष्ट शाही सैन्यापासून आमच्या वस्त्यांचं रक्षण करतो. राजे, तसा धनुष्याचा निशाणासुद्धा उत्तम आहे!” दौलतराव म्हणाला.

“छान! आणखी काय जमते?” शिवबांनी विचारले.

“वेश बदलतो. कधी जोग्त्या, तर कधी वासुदेव बनून गावागावात हिंडतो.”

“का?”

“त्यामुळं थोडंफार धान्य झोळीत पडतं. त्यावर घर चालतं आणि राजे अजून एक अशी कला आत्मसात केली आहे जी कुणाला सहजासहजी अवगत होणार नाही. म्हणजे मला तसा त्या कलेचा गर्व नाही; पण त्यामुळं मी शिकार छान करू शकतो याचा खूप आनंद आहे.”

“कोणती कला?”

Bahirji Naik बहिर्जी नाईक

“राजे, मी हुबेहूब नकला करू शकतो. सगळ्या पशुपक्ष्यांचे आवाज काढू शकतो. त्यामुळे शिकार करताना मला त्याचा लाभ होतो. वेगवेगळे आवाज काढून सावजाला निशाण्यासमोर आणतो आणि तीर सोडून त्याला आडवं पाडतो.”

शिवबांनी अवाक् होऊन दौलतरावाकडे पाहिले.

“म्हणजे तुम्ही मोठ्या चलाखीने शिकार करता, सावजाला विवश करता. उत्तम! अतिउत्तम!”

शिवरायांच्या मस्तिष्कात आता विचार सुरू झाला होता. दौलतरावाने नकळत मोठी गोष्ट त्यांना शिकवली होती. बलाढ्य शाहीची शिकार करण्यासाठी दौलतरावासारखा शिकारी त्यांना यश मिळवून देईल किंवा यशाच्या अगदी जवळ नेऊन पोहोचवेल हे शिवबांच्या पूर्णतः लक्षात आले होते.

“काय झालं राजे?” दौलतरावाने विचारले.

“काही नाही, तुमच्या कलेचं दर्शन घ्यावे म्हणतो!”

“बघा की मग राजे. थांबा तुम्हाला सगळ्या पशुपक्ष्यांचे आवाज काढून दाखवतो!” असे म्हणत क्षणाचाही विलंब न करता दौलतरावाने काही पशुपक्ष्यांचे हुबेहूब आवाज काढून दाखवले.

“अप्रतिम!” शिवबा अचंबित झाले होते.

नुसते शिवबाच नाही, तर सगळे सवंगडी अवाक् होऊन पाहत होते. राजे बारीक डोळे करत विचारातून बाहेर आले. एक भुवई हलकीशी उंचावून त्यांनी दौलतरावाला विचारले,

Bahirji Naik बहिर्जी नाईक

“फक्त पशुपक्ष्यांचेच आवाज काढायला जमतात, की…”

“नाही. नुसत्याच पशू-पक्ष्यांचे नाही, तर कोणत्याही स्त्री-पुरुषाच्या आवाजाची नक्कल मी जशीच्या तशी करू शकतो!”

“वा! अविश्वसनीय!”

“अविश्वसनीय असले तरी विश्वास ठेवा राजे! बघा तुम्हाला एक नमुना दाखवतो.” असे म्हणत दौलतरावाने क्षणभर डोळे बंद केले.

नंतर चेहऱ्यावरील भाव बदलत तो बोलू लागला,

“ठीक. थोडा वेळ प्रतीक्षा कर. तुझं नाव-गाव सगळं नीट सांग. जिजाऊसाहेब येतीलच थोड्यावेळात तेव्हा त्यांच्या हातून बक्षीस घे!” दौलतरावाच्या तोंडचे शब्द ऐकून शिवबा थक्क होऊन बघत राहिले. त्यांनी सवंगड्यांना पटकन प्रश्न केला.

“हा आवाज कुणाचा आहे ठाऊक आहे का कुणाला? मला ठाऊक आहे. अगदी जसाच्या तसा आवाज आहे. तीच लकब, तोच स्वर, तीच कणखरता. ओळखा कुणाचा आवाज काढला दौलतरावाने?” शिवबा न थांबता बोलत होते.

दौलतरावाची ही अनोखी कला पाहून शिवबांना परमोच्च आनंद झाला.

सवंगडी विचारात, तणावग्रस्त होऊन बसले होते.

Bahirji Naik बहिर्जी नाईक

“आवाज महालातील कुणाचा आहे, ओळखीचा आहे. रोजच ऐकतो, पण आता पटकन लक्षात येत नाहीये!” सूर्याजी अडखळत बोलत होता.

“हो, रोजच ऐकतो आपण हा आवाज. कारण हा आवाज आपल्या राणोजी अप्पांचा आहे!”

सर्वांनी आश्चर्यचकित होऊन एकमेकांकडे पाहिले. शिवबांची कौशल्य आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट होता. शिवबा विश्वनाथजीकडे वळून म्हणाले, “विश्वनाथजी, किल्ल्यात जाऊन किल्ल्याची सखोल माहिती सांगणारा तुमचा साथीदार मिळाला आणि आम्हाला मिळाला एक तिसरा डोळा – शिवबाचा तिसरा डोळा, जो अत्याचारी शाह्यांना भस्म करील!”

“काही कळलं नाही राजे!” दौलतराव गोंधळून म्हणाला.

Bahirji Naik बहिर्जी नाईक

“सांगतो, सांगतो. आधी सर्वांनी आरामात बसू!” शिवबांनी एका झाडाखालच्या दगडाकडे इशारा केला. सर्वांनी त्या दाट झाडाखाली बसले, आणि शिवबा दगडावर बसले.

“दौलतराव, आपण एक स्वराज्य निर्माण करणार आहोत, जे रयतेच्या राज्याचे असेल, जिथे गरीब आणि दुर्बळांवर अन्याय होणार नाही. सर्वांना न्याय मिळेल. शत्रूच्या आक्रमणांपासून आपल्या भूमीचे रक्षण करणे हे आपले उद्दिष्ट आहे. हे सवंगडी या कार्यात आपल्याला शेवटपर्यंत साथ देतील. आता तुम्हीसुद्धा आमचे सवंगडी आहात!”

“राजे, हा प्राण, हे शरीर तुमच्यासाठीच आहे!” दौलतराव तत्काळ म्हणाला.

“आजपासून तुम्हीसुद्धा स्वराज्याचे सारथी आहात.” शिवबा म्हणाले. “माझं भाग्य आहे हे राजे! पण एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर काही मिळत नाहीये. कृपया विचारू का?”

“विचारा!” शिवबा म्हणाले.

“तुम्ही शहाजीराजांचे पुत्र. तरी तुम्ही जंगलात तलवारींचे धडे का देता?”

Bahirji Naik बहिर्जी नाईक

दौलतरावाच्या प्रश्नाने शिवबांची नजर पुन्हा दौलतरावाच्या चेहऱ्यावर स्थिरावली. शिवबा तात्काळ थक्क झाले. दौलतरावाच्या तीव्र बुद्धीने शिवबांना प्रभावित केले. “तुम्ही कसे ओळखले की इथे शस्त्राभ्यास सुरू आहे?”

“रानात आले तेव्हा मला तलवारीच्या घर्षणाचा आवाज ऐकू आला. तुम्ही इथे पोहोचण्याच्या आधीच आवाज बंद झाला होता. मोराच्या केकारवण्याचा आवाज ऐकला. तो तुम्हाला दिला गेलेला इशारा असावा. इथे पोहोचलो तेव्हा तुम्ही विटी-दांडू खेळत होता, आणि झुडपाच्या खोडाजवळ तलवारीची मूठ दिसली.” दौलतरावाने सांगितले.

सर्वांनी झुडपाकडे लक्ष वेधले, आणि खरोखर तिथे लपवलेली तलवारीची मूठ दिसली.

“पण तुम्ही आला तेव्हा तर फक्त आमच्याकडेच पाहत होतात.” शिवबांनी विचारले.

“हो. पण मस्तिष्काच्या एका कोपऱ्यात हे विश्लेषण सुरू होतं.”

“तुम्ही साधे नाहीत. दौलतराव, तुम्हाला कल्पना नाही तुम्ही किती धनी माणूस आहात.” शिवबाराजे दगडावरून उठून दौलतरावाजवळ आले.

तानाजीने विचारले, “दौलतराव, तुम्हाला कसं कळलं की मोराच्या केकारवण्याचा आवाज ही राजांसाठी सूचना होती?”

Bahirji Naik बहिर्जी नाईक

“सोप्पं आहे. या ऋतूमध्ये मोर केकारवत नाहीत. त्यातली आवाज कदाचित सूचनेसाठी, सावध करण्यासाठी असेल.” दौलतरावाने उत्तर दिले.

शिवबा आणि सवंगडी थक्क झाले. शिवबांनी दौलतरावाला आनंदाने मिठी मारली.

“तुम्ही एक अनमोल व्यक्ती आहात दौलतराव!” जिजाऊसाहेबांनी सांगितले.

“तुम्ही स्वराज्याच्या विजयासाठी नवे चाणक्य आहात,” असे म्हणत त्यांनी दौलतरावला नवीन पेहराव भेट दिला.

जिजाऊसाहेबांनी दौलतरावाला स्वराज्याच्या गुप्तचराच्या जबाबदारीची सूचना केली. दौलतरावाने संमती दिली.

शिवबाराजांनी जिजाऊसाहेबांच्या सूचनेला मान्यता दिली, “ईश्वराने तुमच्या मदतीला महान आत्म्यास पाठवले आहे.”

रात्रीच्या शांततेत दौलतराव आपल्या वस्तीच्या गॅरड उजळलेल्या प्रकाशात विचारात गेला, “कुठे ही झोपड्यांची वस्ती आणि कुठे शिवबांचा महाल? त्यांचे हृदय विशाल आहे. त्यांच्या आलिंगनामुळे जीवनातला आनंद अनुभवला. आता स्वराज्याची सुरक्षा आणि विजय निश्चित करणे हे माझे कर्तव्य आहे.”

दौलतराव आपल्या नव्या जीवनाच्या उन्नतीसाठी उत्साही होता.

Bahirji Naik बहिर्जी नाईक

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लीक करा