Sinhagad fort सिंहगड किल्ला आणि त्या वर असणाऱ्या अश्या 5 वास्तू Very useful Information

सिंहगड किल्ला Sinhagad fort

जवळ पास सर्वीकडे आता पाऊस हा सुरु झाला आहे आणि त्यात ट्रेक करणे म्हणजे सर्वांच्या आवडीचे कारण बाकीच्या ऋतू मध्ये ट्रेक करणे म्हणजे खूप अवघड आणि आपल्या शरीराची कस दाखवणार असते.

आज आपण अश्या एका किल्याची माहिती पाहणार आहे जो कि पुण्याच्या नैर्ऋत्येला असलेला आणि अश्या एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार असलेला आपल्या सर्व पुणेकरांचा नाही तर अख्या महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींचा आवडीचा दुर्ग म्हणजे कोंढाणा उर्फ सिंहगड किल्ला.

प्रथम तर आपण याची माहिती पाहूयात.

sinhagad fort

किल्ल्याची ऊंची – सिंहगड किल्ल्याची ऊंची जवळपास 4400 फूट असावी. हा किल्ला पुण्याच्या नैर्ऋत्येला भागात सुमारे २५ ते ३५ किमी च्या  अंतरावर असून सह्याद्रीच्या पूर्व शिखरावर  पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर असणारा एक मानबिंदू आहे

sinhagad fort
Sinhagad Fort Map – trekshitiz sanstha

किल्ल्याचा प्रकार – सिंहगड हा गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. गिरिदुर्ग म्हणल कि दमछाक हि आलीच, शीरीराची चाचणी करणारे ट्रेक असतात पण त्या प्रकारामध्ये एक अजून पोटप्रकार येतात जसे कि सोपा, मध्यम, अतिमध्यम, अवघड, अति अवघड इत्यादी तसे सिंहगड हा मध्यम श्रेणी मधील एक दुर्ग आहे.

Sinhagad fort किल्ल्यावर का जायचे याबद्दल चा थोडा इतिहास पाहूयात – पाऊस सुरु झाला म्हणून फक्त निसर्गाचा स्वाद घेण्यासाठी नाहीतर त्यावर घडलेल्या इतिहासिक घातेनाच्या अनुभव घेण्यासाठी तेथे जायचे, किल्यावरुन दिसणारा पानशेत आणि खडकवासला धरणाचा परिसर पाहण्यासाठी नाही तर गडावर असणाऱ्या ऐतिहासिक वास्तू पाहण्यासठी आपल्याला तिथे गेले पाहिजे.

चला थोडे आता इठीहासा कडे वळूयात सर्वाना गडाबद्दल चा इतिहास बर्यापैकी माहित असेलेच पण काहीना माहित नसेल त्याच्या साठी थोडे सोयीचे होईल यासाठी सांगतोच आणि हा ज्यांना आम्हीत आहे त्यांनी पण वाचा कारण कदाचित तुम्हाला हि माहित नसेल असा काही चुकून असेल तर तुमच्या साठी उपयोगाचे ठरेल

सिंहगड किल्ला याचा जर आपण इतिहास जर पहिला तर पहिला उल्लेख हा आपल्याला १३२८ या कालखंडात कुतुह्सालातीन हे एक काव्य आहे त्यामध्ये पहिल्यांदा उल्लेख झाला आहे.

त्यामध्ये तुघ्लाकानी हा किल्ला जिंकला याचा प्रथम उल्लेख आहे. त्यानंतर च्या महत्वाच्या २ घटना सर्वाना माहित आहेच तानाजी मालुसरे यांचे बलिदान आणि नवजी बलकवडे यांचा पराक्रम पण त्या आधी एक सांगतो सहजी राजे महुलाला अडकले होते व मुघल आणि आदिल शाही त्यांना पकडण्याचा आणि हरवण्याचा प्रयत्न करत होते.

त्यावेळी आदिलशाही विजापूर ला होती आणि ते माहुलीला रसद पाठवत होते आणि सिंहगड किल्ला हा तसा पहिला गेला तर विजापूर आणि माहुली या दोनींच्या मधील भागात मोडतो तेथील डोणजे गावच्या खिंडीत उद्धोवजी माय्ध्ये म्हणून जे होते त्यांनी हल्ला करून तो सर्व खजिना लुटला होता . हि एक मोठी घटना या ठिकाणी झाली आहे.Sinhagad fort

तानाजी मालुसरे यांनी केलेला पराक्रम आपल्याला माहितच आहे त्याबद्दल आता येथे जास्त न बोलता पुढे जाऊयात हा पण लवकरच आपण नरवीर तानाजी मालुसरे यांबद्दल चा माहितीपूर्ण लेख आपल्या वेब साईट वर प्रसारित करू.

चला तर आता महत्वाचे तुम्हमाहाला जाणून घ्यायचे आहे सिंहगड किल्ल्या या बद्दल ते म्हणजे किल्ल्याबद्दल माहिती, कोठून येणार कसे येणार किल्ल्यावर जाण्यासाठी किती मार्ग आहेत, काय काय वास्तू आहेत , त्या चांगल्या अवस्थेत आहेत का, किल्ल्यावर पार्किंग ची जेवणाची इत्यादी गोष्टींची सोय आहे का,

किल्यावर जाण्यासाठी दोन प्रमुख वाहन मार्ग आणि एक पायी मार्ग आहे.ते सर्व आपल्याला गणेश दरवाज्याच्या जवळ नेऊन सोडतात, पहिला म्हणजे पुण्यावरून खडकवासला मार्गे डोणजे गावातून घाटमार्गाचा वापर करून तर त्याच मार्गांनी आतकरवस्ती मार्गे पायी पूर्ण किल्ला चढून जाता येते. आणि दुसरा मर्ग म्हणजे कोंढणपूर व कल्यान यागाव्तून येणारा मार्ग पण पुण्याचा मार्ग तसा सोयीचा हे तुम्हाला पुण्यातून शनिवार वाद येथून PMT बस पायथ्याला आणून सोडतील तेही खूप कमी शुल्कात तसेच बस चा वावर सध्या या ठिकाणी वाढला आहे त्यामुळे पायी जाणाऱ्या साठी  खूप सोयी चे झाले आहे तसेच ज्यांना थेट वर वाहन घेऊन जायचे आहे त्यांनी इतर मार्गांचा  वापर करावा.

गडावर सध्या असणाऱ्या वास्तू

Sinhagad fort photos सिंहगड किल्ल्याचे महत्त्वाची ऐतिहासिक ठिकाणे व त्यांची माहिती:

1. पुणे दरवाजा

  • गडाच्या उत्तरेला असलेला अनुक्रमे २ शिवकालीन दरवाजे आहेत व ते त्या  काळापासून वापरात आहेत.
  • यापैकी तिसरा दरवाजा यादवकालीन आहे.
  • या दरवाज्यांवर वेगवेगळी शिल्पे आहेत.

2. खांद कडा

  • दरवाजातून आत येताना 30 ते 35 फूट उंचीचा हा खांद कडा लागतो.
  • यावरून पुणे, पुरंदरचा परिसर दिसतो.

3. दारूचे कोठार

  • दरवाजातून आत येताना उजवीकडे असलेली ही दगडी इमारत म्हणजे  दारू कोठार होय.
  • 11 सप्टेंबर 1751 रोजी या कोठारावर वीज पडली, त्यात गडावरील फडणीसांचे घर उध्वस्त झाले. अश्या खूप वेगवेगळ्या कथा येथे सांगितल्या जातात.

4. टिळक बंगला

  • रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या या जागेवर बाळ गंगाधर टिळक येत असत व राहत असत.
  • 1915 मध्ये महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची भेट या बंगल्यात झाली होती.

5. कोंढाणेश्वर

  • शंकराचे हे मंदिर यादवांचे कुलदैवत असून, येथे महादेवाची पिंड आह.
  • Sinhagad fort

6. श्री अमृतेश्वर भैरव मंदिर

  • कोंढाणेश्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे चालत गेलो कि डावीकडे अमृतेश्वराचे अति  प्राचीन मंदिर लागते, हे भैरव या  कोळ्यांचे दैवत आहे यादवांच्या आधी ह्या गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात सुबक अश्या भैरव आणि भैरवी अशा दोन मुर्ती दिसतात भैरवाच्या हातामध्ये राक्षसाचे शीर आहे

7. देवटाके

  • तानाजी स्मारकाच्या मागून असलेल्या या छोट्या तलावाचे पाणी पिण्यासाठी वापरले जात होते. महत्वाचे म्हणजे हे बारमाही पिण्याच्या  पाण्याचे टाके आहे.
  • महात्मा गांधी जेव्हा पुण्यास येत, तेव्हा या टाक्याचे पाणी मागवत असत.

8. कल्याण दरवाजा

  • गडाच्या पश्चिमेस असलेला हा दरवाजा  इतिहासिक गोष्टी चा साक्षीदार आहे.
  • या दरवाज्याच्या दोन्ही बाजूंच्या भिंतीत हत्ती व माहूत अशी दगडी शिल्पे होती.

10. झुंजार बुरूज

  • सिंहगडचे दक्षिण टोक असलेला हा बुरूज म्हणजेच जुंझार बुरुज’
  • येथून राजगड, तोरणा गड व पानशेतचे खोरे दिसतात.

11. द्रोणागिरीचा उर्फ तानाजी कडा

  • झुंजार बुरूजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने जाता येणारा हा कडा म्हणजे द्रोणागिरीचा उर्फ तानाजी कडा
  • तानाजी मावळ्यांसह या कड्याने वर चढला होते आणि विजय मिळवला होता.

12. राजाराम स्मारक

  • राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी घुमटी असलेले हे स्मारक.
  • छत्रपती राजाराम महाराजांची समाधी आहे. राजाराम महाराजांची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

13. तानाजी मालुसरे यांचे  स्मारक

  • अमृतेश्वराच्या मागच्या बाजूने असलेले हे स्मारक म्हणजे आपल्या सिंहाचे आपल्या शूरवीर तानाजी महाराजांचे स्मारक.
  • तानाजी मावळ्यांसह या ठिकाणी मारला गेला होता.

9. उदेभानाचे स्मारक

  • दरवाजाच्या मागच्या बाजूस असलेल्या टेकडीवर हे स्मारक आहे.
  • मोगलांतर्फे उदेभान हा सिंहगडचा अधिकारी होता व त्यासोबतच तानाजी मालुसरे यांचे युद्ध झाले

Sinhagad fort photos सिंहगड किल्ल्यापर्यंत पोहोचण्याच्या वाटा:

पुणे – कोंढणपूर मार्ग

  • पुणेहून खेद शिवापूर कोंढणपूर या मार्गाने जाता येते.
  • कोंढणपूरला उतरून कल्याण गावातून कल्याण दरवाजातून किल्ल्यावर प्रवेश करता येतो.
  • या मार्गाने आपल्याला  दोन दरवाजे पार करावे लागतात.

पुणे दरवाजा मार्ग

  • पुणेहून खडकवासला डोणजे आतकर वस्ती मार्गे  सिंहगदावर जाता येते जाता येते.
  • वाटेत खडकवासला धरण येते.
  • या मार्गाने तीन दरवाजे पार करावे लागतात, सोपी चढाई आहे.

सामान्यत: खाजगी वाहनांनी थेट किल्ल्यावर जाता येते. पायी प्रवास करण्यासाठी आतकरवाडी गावातून मळलेल्या पाऊलवाटेने 1.30 तासात किल्ल्यावर पोहोचता येते. पुणे महानगरपालिकेच्या बसेसही हातकरवाडीपर्यंत सेवा देतात व दर एका तासाच्या अंतरानी डोणजे या ठिकाणी आपल्या या बसेस भेटतात

Sinhagad fort photos

impotat questions

सिंहगड किल्ल्याचे जुने पुरातनकालीन नाव काय होते?

तानाजी मालुसरेंच्या मृत्यू नंतर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण माझा सिंह गेला” त्त्यांयावरून त्यानी  कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.

सिंहगड किल्ला किती वर्ष जुना आहे?

सिंहगड किल्ला  प्रारंभास ऋषींच्या नावावरून “कोंढाणा” म्हणून ओळखला जात असे. कौंडिण्येश्वर मंदिरावरील  कोरीव काम दर्शवते की हा किल्ला सुमारे दोन हजार वर्ष तरी  पूर्वी बांधला गेला असावा.

आपण दिलेली  सर्व माहिती हि  प्रामाणिकपणे आमच्या आलेल्या वाचनातून आम्ही केलेल्या दुर्ग भ्रमंती मधून लिहित आहे, कृपया काही आक्षेप असलेल्यास आमच्याशी संपर्क साधा व सध्या आपण या वेबसाईट च्या माध्यमातून सर्वाना बहिर्जी नाईक, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा इतिहास त्यांचे मावळे, त्यांनी जिंकलेले किल्ले यासर्वांची माहिती लवकरच उपलब्ध करून देणार आहोत.

कृपया हि सर्व माहिती आवडली असेले तर नक्की सर्वांपर्यंत share करा जेणे करून आम्हाला अजून नवनवीन माहिती घेऊन तुमच्या पर्यंत पोहचता येईल.